या पुस्तकातील पानापानांवरील अश्रूंची शाई आपल्या डोळ्यांवरील झापड उघडेल, अशी मला आशा आहे…
आपल्या देशात दररोज बापूंची हत्या होते, हे मी यापूर्वीही अनेकदा लिहिलं आहे. एक दिवस मरायचं असेल तर ते सोपं असेल, जे लोक रोज क्षणोक्षणी मरतात आणि तरीही जिवंत उरतात, त्यांना विचारा या वेदनेबद्दल! १० आणि १५ वर्षांच्या तुरुंगवासानंतर जेव्हा जेव्हा एखादी व्यक्ती निर्दोष मुक्त होते, तेव्हा तेव्हा आपली संस्कृती आणि आपला कायदा, या दोन्हींचा पराभव होत असतो.......